Senior Citizens Problems : असुरक्षिततेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चिंतेत भर

senior citizens News
senior citizens Newsesakal

नाशिक : पेन्शन असो वा विसंवाद यासारख्या सुलतानी व अस्मानी संकटाने ग्रासलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येत असुरक्षिततेची आणखी एक भर पडली आहे. शहरात ज्येष्ठ नागरिकांना मारहाणीच्या प्रकारात वाढ झाली असून, पोलिसांनी जागोजागी बसणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. (Emphasis on senior citizens concerns due to insecurity Nashik News)

गोविंदनगर बोगद्याजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला काही टवाळखोरांकडून मारहाण झाली. त्याचबरोबर गाडीच्या काचा फोडण्याचा प्रकारदेखील घडल्याने यातून ज्येष्ठांसमोर असुरक्षिततेची समस्या निर्माण झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. पेन्शन वेळेत न मिळणे, सरकारी कार्यालयात मान-सन्मान न मिळणे, कुटुंबामध्ये वाढता विसंवाद, आरोग्य यासारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येत मारहाणीनंतर भर पडली आहे. समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक टाहो फोडत असताना पोलिसांकडून मात्र दखल घेतली न गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मारहाणीनंतर ज्येष्ठांच्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या असल्या तरी ही समस्या नवीन नाही. शहरातील अनेक भागात टवाळखोरांचा उपद्रव आहे. त्याचा सर्वाधिक त्रास महिलानंतर ज्येष्ठ नागरिकांना आहे. महापालिकेकडून चौकाचौकांमध्ये लोखंडी बाकडी टाकण्यात आले. त्यावर टवाळखोरांनी ठाण मांडताना ज्येष्ठांची हक्काची जागा हिरावली आहे. उद्यानामधील जागादेखील तरुणांनी बळावल्याने तेथेही पोचता येत नाही.

पोलिसांनी घ्यावी भेट

ज्येष्ठ नागरिकाला मारहाणीचे निमित्त असले तरी यानिमित्ताने असुरक्षिततेच्या या गंभीर समस्येकडे पोलिसांनीदेखील गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. शहरात घरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून दर पंधरा दिवसांनी ते राहत असलेल्या निवासस्थानी भेट देण्याची मागणी होत आहे.

senior citizens News
Damage Road : मनमाड- गिरणारे रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जडले आजार

ज्येष्ठांच्या समस्या

- सरकारी बँकेत ज्येष्ठांना रांग लावावी लागते.
- बँकेत बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.
- एसटीमध्ये सवलतीसाठी साठ वयोमर्यादा असावी.
- रेल्वे तिकीट दरातील सवलत बंद.- शहरात स्वच्छतागृहे, शौचालय नाही.
- किमान दहा हजार पेन्शन मिळावी.
- सरकारी कार्यालयांमध्ये सन्मानाची वागणूक नाही.
- कुटुंबात वाढते विसंवाद.

"गोविंदनगर येथे दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकाला झालेली मारहाण ही फार वेदना देणारी घटना आहे. ज्येष्ठ नागरिक हा समाजाला आणि देशाला योग्य दिशा देणारा नागरिक आहे आणि अशा ज्येष्ठांना जर विनाकारण मारहाण होत असेल तर हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. समाजातील तरुणांनी ज्येष्ठांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, पोलिसांनी सुद्धा ज्येष्ठांना आधार द्यावा व जे कोणी ज्येष्ठांना त्रास देत असतील, त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा." - रवींद्र वाटेकर, सचिव, दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघ

"ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, ज्येष्ठांचे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. नुकताच ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस खाते सजगपणे कार्यरत आहे; परंतु त्यांनी विशेष करून ज्येष्ठांच्या सुरक्षिततेत वाढ करावी, असे वाटते. ज्येष्ठ मंडळी राहत असतील तेथे अधूनमधून जाऊन त्यांची विचारपूस करायला हवी, तसेच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्यांचे प्रबोधन करून आजी-आजोबांकडे लक्ष द्यावे असे सांगावे. मुले लांब राहत असल्याने त्यांना वाटणारा असहायपण कमी होईल." - कुमुदिनी कुलकर्णी, द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघ

senior citizens News
Nashik : पिंपळगावला आगारावर दिवाळी प्रसन्न!; लालपरी 10 दिवसात मालामाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com