कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाविरोधात आक्रोश

Employee Protest
Employee Protestesakal

नाशिक : राज्य मध्यवर्ती संघटनेने राज्यात बुधवार (ता. २३) पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी द्वारसभा निदर्शनातून राज्य शासनाचा निषेध केला. राजपत्रित कर्मचारी संघटना, गट कर्मचारी संघटना, चतुर्थश्रेणी कामगार संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

Employee Protest
Students Protest | विद्यार्थी आंदोलनामागे कोणाचा तरी हात ! दिलीप वळसे पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector office) आवारात महसूल संघटनेचे नरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निदर्शने करीत राज्य शासनाचा निषेध केला. दोन वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. राज्य मध्यवर्ती कामगार संघटनेसह, राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे यासंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. महसूल संघटनेने ४ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. नाशिकला महसूल संघटनेचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष हेमंत साळवी, कार्याध्यक्ष विलासराव कुरणे, सरचिटणीस नरेंद्र जगताप, कोषाध्यक्ष राहुल शेटे, संघटक नंदकुमार बुटे आदीच्या उपस्थितीत बैठकही झाली होती. राज्य सरकारी - जिल्हा परिषद शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती नेतृत्वाखाली १७ लाख कर्मचारी शिक्षकांनी दीर्घकाळ प्रलंबित मागण्यासाठी बुधवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपाचा इशारा दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जुनी पेन्शन योजना लागू करावी, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन, रजा रोखीकरण आदी विषयावर केंद्राशी बोलून काही विषय सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Employee Protest
Student Protest: ऑफलाईन परीक्षांना विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे प्रकरण निकाली काढणे, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासह विविध मागण्यांवर चर्चा झाली होती. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक या ठिकाणी गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचारी संघटनेच्यावतीने भोजन काळात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. राजपत्रित अधिकारी संघटना, गट क कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मंगेश मरकड, ज्येष्ठ मार्गदर्शक सी. टी. कांबळे, उमेश सरडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संजय शिंदे, संदीप पाटील, वाघमारे, निकम, बोरसे आदींसह कर्मचारी सहभागी झाले.

Employee Protest
CAA Protest : UP सरकारकडून वसूली नोटिसा मागे घेण्याचा निर्णय

या आहेत मागण्या

महसूल विभागात सहायकांची रिक्तपदे भरावीत, पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमर्यादेत पार पडावी, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवावा

नव्या २७ तालुक्यांसाठी विविध पदनिर्मिती करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग-३ पदोन्नती द्यावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com