Employees Strike: मालेगावाला संपकऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी; संपाच्या दुसऱ्या दिवशी घंटानाद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teaching staff during the Holi of the government decision

Employees Strike: मालेगावाला संपकऱ्यांकडून शासन निर्णयाची होळी; संपाच्या दुसऱ्या दिवशी घंटानाद आंदोलन

मालेगाव शहर (जि. नाशिक) : राज्यातील शासकीय निमशासकीय व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या निर्णयानुसार सर्वत्र १४ मार्चपासून कर्मचारी संपात उतरलेले आहेत.

मालेगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध आस्थापना पंचायत समिती जिल्हा परिषद आरोग्य विभाग ग्रामसेवक तलाठी या विभागातील कर्मचारी यांनी संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत निदर्शने केली.

राज्य मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनानुसार संपर्क यांनी घंटानाद करत शासनाने पेन्शन संदर्भात गठित केलेल्या समितीच्या निर्णयाची होळी करत सरकारचा सामूहिक निषेध व्यक्त केला. (Employees Strike strikes against government decision On second day of strike thali naad movement at Malegaon nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

शहरातील विविध राजकीय नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे बारा बलुतेदार मित्र मंडळाचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव, मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवा सचिव दिनेश ठाकरे, शहराध्यक्ष अनंत भोसले, शेखर पगार, यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा देणारा मनोगत व्यक्त केले.

संपाच्या निमित्ताने विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत संपाची तीव्रता कायम ठेवली आहे. दरम्यान या संपात काव्यांजली नेरकर या चिमुकलीने ‘पेन्शन द्या सरकार म्हणतं’ मनोगत व्यक्त केले.

तर महिला शिक्षिका यांनी पेन्शन मागणी करणारे भजन, गझल, गीते यावेळी सादर केले. यावेळी अनेक महिला कर्मचारी लहान बाळ घेऊन संप निदर्शने करताना सहभागी झाले होते.
यावेळी सर्व कर्मचारी व शिक्षक संघटना पदाधिकारी यांचेसह संपात सहभागी असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती.

टॅग्स :NashikEmployeesStrike