Nashik Bus Fire : नाशिक- वापी बसच्या इंजिनला लागली आग; सर्व जण सुखरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Fire

Nashik Bus Fire : नाशिक- वापी बसच्या इंजिनला लागली आग; सर्व जण सुखरूप

पेठ : नाशिक आगाराची बस वापीवरून नाशिककडे येत असताना अचानक बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली अन सर्व प्रवाशांना सुखरूप उतरविले. प्रवाशींसह वाहक व चालक सुखरूप बचावल्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

नाशिक आगाराची नाशिक - वापी बस ( एमएच १४ , बीटी ४५७०) ही वापीहून नाशिककडे येत असताना सकाळी सव्वानऊच्या सुमारास पेठमधील जुन्या बसस्थानक चौकात आली असताना बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघू लागला.

चालकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना उतरविले. धुराचे लोट निघत असतानाच त्याचवेळी पाण्याच्या टाक्या भरलेला ट्रॅक्टर रस्त्याने जात होता. त्यातील पाण्याच्या साह्याने बसची पेटलेली वायरींग नागरिकांच्या सहकार्याने विझविण्यात आली. पेठ आगारातून आग विरोधक गॅस सिलेंडरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशी व नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Nashikfirebus accident