Missing Case : अभियांत्रिकीचा विद्यार्थी बेपत्ता

Missing Aniket Adsun
Missing Aniket Adsun esakal

नाशिक : मूळचा पुण्याचा असलेला व सध्या संदीप फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेत अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेला २१ वर्षीय विद्यार्थी २६ जुलैपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल झाली आहे. (Engineering student missing nashik Missing Case Latest Marathi News)

Missing Aniket Adsun
NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ

अनिकेत भवानीदास अडसून (२१, मूळ रा. पुणे) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा संदीप फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

अनिकेत हा २६ जुलै रोजी दुपारी गेटपास घेऊन महाविद्यालयाच्या कॅम्पसबाहेर पडला, तो अद्यापपर्यंत परतलेला नाही. अनिकेतची उंची ५.५ इंच, रंगाने गोरा, चेहरा गोल, अंगात लाल चौकटीचा शर्ट, ग्रे रंगाची पॅन्ट, पायात निळ्या रंगाची चप्पल असून तो मराठी बोलतो.

या संदर्भात माहिती मिळाल्यास तत्काळ त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाणे (०२५९-४२३३१३३) वा ९८५०३७१५८० या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन सहाय्यक उपनिरीक्षक अशोक बोडके यांनी केले आहे.

Missing Aniket Adsun
घंटागाडीच्या ठेक्यात संशयास्पद कागदपत्रे; NMC आयुक्तांकडून पडताळणीच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com