esakal | कामगारांविना लघुउद्योजक मशिनवर भिडले! ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा
sakal

बोलून बातमी शोधा

Entrepreneurs are working on the machines themselves as there are no workers

कामगारांविना लघुउद्योजक मशिनवर भिडले! ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा

sakal_logo
By
सतीश निकुंभ


सातपूर (नाशिक) : लॉकडाउनमुळे शेकडो लघुउद्योगांतील कारागीर व कामगार गावी निघून गेल्यामुळे लघुउद्योजकांना आपली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. एस. डी. पाटील या लघुउद्योजक स्वतः मशिनवर काम करताना पाहायला मिळाले.

उद्योगांची चाके बंद..!

लॉकडाउनच्या तिसऱ्या दिवशी सर्वच स्तरांवरील उद्योग कमी-अधिक प्रमाणावर सुरू झाले आहेत. काही लघुउद्योगातील कारागीर व कामगार गावाकडे निघून गेल्यामुळे शेकडो उद्योगांचे उत्पादन बंद करण्याची वेळ आली होती. त्यांपैकी काहींनी हातातील ऑर्डर पूर्ण करण्यासाठी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांना मशिनवर काम करताना पाहायला मिळाले. सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत भाड्याने गाळा घेऊन काम करणाऱ्या लघुउद्योजकांची संख्या मोठी आहे. कामगार गावाकडे निघून गेल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे. तिसऱ्या दिवशी सर्वच कंपन्या सुरू झाल्याने त्यांना लागणारे छोटे-मोठे पार्ट तयार करण्यासाठी या लघुउद्योजकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कंपन्या सुरू झाल्या असल्या तरी अनेक लघुउद्योगांना ऑक्सिजन लागतो. प्रशासनाने सर्व ऑक्सिजन हॉस्पिटलला सप्लाय केल्यामुळे अनेक उद्योगांची चाके बंद झाल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली! अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्यकोरोनाची भीती व लॉकडाउनमुळे कामगार गावाकडे निघून गेल्यामुळे ऑर्डर कशी पूर्ण करायची, याबाबत मोठी चिंता आहे. ऑर्डर पूर्ण नाही झाली तर हातातील काम बंद होईल, यामुळे स्वतःला कामाला भिडावे लागले.
-एस. डी. पाटील, लघुउद्योजक

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा