Nashik News : माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या पादयपूजनातून जपले ऋणानुबंध | Ex students preserved their debt through teacher foot worship at reunion at sinnar Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students with their teacher

Nashik News : माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या पादयपूजनातून जपले ऋणानुबंध

Nashik News : शिक्षकांचे पाद्यपूजन करून वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेले ऋणानुबंध ३० वर्षांनंतरही कायम ठेवले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सन १९९३-९४ मध्ये दहावीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा 'ऋणानुबंध' नावाने विद्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी. डी. बनसोडे, प्राचार्य बी. के. खैरनार एस. एन. खालकर, आर. डी. गिते, एम. बी. जाधव, बी. एन. निरगुडे, एस. पी. पवार, बी. व्ही. कडलग, खंडेराव खुळे, रामनाथ गिते, खंडू गिते आदी उपस्थित होते. (Ex students preserved their debt through teacher foot worship at reunion at sinnar Nashik News)

दहावीची परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काहींची भेट व्हायची तर काहींची अद्यापही झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र आणून स्नेहमेळावा घेण्याचे ठरले. त्यानुसार सुमारे ५० विद्यार्थी एकत्र आले.

त्यातून विचारांची देवाण-घेवाण झाली. शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात करत असलेले कार्य पाहून शिक्षकांनाही गहिवरून आले. यावेळी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब खुळे, सूत्रसंचालन प्रशांत तळेकर तर आभार रमेश खुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल आहेर, योगेश खुळे, विजय खुळे, केशव खुळे, रंगनाथ कोकाटे, माधव खुळे,

ज्ञानेश्वर चासकर, मुसरत शेख, रुपाली खुळे, मनीषा खुळे, अशोक जाधव, नारायण चव्हाणके, हरिदास पवार, गोरख गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोहन क्षीरसागर, रावसाहेब शेलार, सुनील खुळे, जनाबाई भोर,

संगीता कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, सीमा पिंपळे, दत्ता चव्हाणके, आण्णासाहेब मवाळ, अण्णा पानगव्हाणे, कैलास ठोक, नितीन कुलथे, रोहिणी पाठक, योगेश काळे, अरुण खुळे, दत्तात्रय खुळे, सुनील सहाणे, गणपत मवाळ, चंद्रकांत पगार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पादयपूजनाने शिक्षक गहिवरले...

दहावी इयत्ता सोडून ३० वर्षे झालेले आपले हे विद्यार्थी त्यांच्यातील बडेजाव विसरून गुरुप्रती शिष्याचे असलेले नाते आजही तेवढ्याच श्रद्धेने जोपासतांना दिसले. विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे पाय धुवून त्यांचे पादयपूजन केले.

वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या व वयाची चाळीशी पार केलेल्या शिष्यांकडून झालेले पादयपूजन पाहून अनेक शिक्षकांचे डोळे पाणावले. गुरू-शिष्यांमधील नाते दाखविणारी भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असल्याचे गौरवोद्गार खालकर यांनी काढले.

हे ऋणानुबंध कौतुकास्पद..

समुद्राची लाट जशी येऊन जाते तसे शाळा सोडून गेलेले विद्यार्थी व सेवानिवृत्त झालेले शिक्षक पुन्हा एकाच वेळी एकत्र येणे शक्य नाही.

मात्र ३० वर्षानंतरही एकाच छताखाली विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र आणून शाळा व शिक्षकांप्रति असलेले ऋणानुबंध जोपासण्याचे काम माजी विद्यार्थ्यांनी केल्याचे गौरवोद्गार माजी प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. डी. बनसोडे यांनी यावेळी काढले.

टॅग्स :Nashikstudentteacher