पुस्तकांवरील देवाणघेवाणीवर अजूनही बंधनच!

books
booksesakal

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे (corona virus) मार्चमध्ये शहरातील वाचनालये, अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. अनलॉक प्रक्रियेच्या (unlock) पहिल्या टप्‍प्‍यात सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, याबाबत निर्णय न झाल्यामुळे वाचनालय, अभ्यासिकांतील विद्यार्थ्यांसह सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. बँकांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू आहे. ‘सुपरस्प्रेडर’ (super spreader) ठरतील, अशा सर्व गोष्टी सुरू आहेत. मात्र, पुस्तकांवरील देवाणघेवाणीवर बंधने का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Exchange-of-books-is-still-restricted-nashik-marathi-news)

लॉकडाउनमुळे वाचनालय आर्थिक संकटात

गेल्या आठवड्यापासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यात बुक स्टॉलचाही समावेश आहे. मात्र, वाचनालयातील पुस्तकांच्या देवाणघेवाणीवर अजूनही बंदी आहे. वाचनालयातील सदस्य पुस्तक बदली करून मिळावे, यासाठी वाचनालयाच्या चकरा मारत आहेत. तसेच अभ्यासिका बंद असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वाचनालय आणि अभ्यासिका कोरोनाचे नियमानुसार पुढील टप्प्यात सुरू केल्या, तर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच लॉकडाउनमुळे वाचनालय आर्थिक संकटात सापडले आहेत.

नाशिकमध्ये सुपरस्प्रेडर ठरतील, अशा सर्व गोष्टी सुरू आहेत. मात्र, वाचनालयाच्या पुस्तकांची देवाणघेवाण बंद ठेवली आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना आता वाचनाची सर्वाधिक गरज असताना वाचनालये बंद ठेवली आहेत. -संजय करंजकर, कार्याध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय

कोरोनाचे नियम अभ्यासिका पाळतील, पण विद्यार्थ्यांना ते शक्य होत नाही. एकमेकांशी चर्चा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र येतात. दुसऱ्या लाटेत तरुण मंडळी बाधित आढळली आहे. पुढील धोका लक्षात घेता अंदाज घेऊन अभ्यासिका सुरू करण्यात याव्यात. अभ्यासाबरोबर आयुष्यही महत्त्वाचे आहे.

-अ‍ॅड. मनीष बस्ते, मुरकुटे अभ्यासिका

books
भगवी शाल घालून महादेव जानकरांचा अंकाई किल्ल्यावर मुक्काम?

लॉकडाउनमध्ये घरी अभ्यास करणे अशक्य आहे. अभ्यासिकेतले वातावरण घरात नसते. अभ्यासिकेत विद्यार्थीशी स्पर्धा परीक्षांबाबत चर्चा करता येते. ती घरी बसून शक्य होत नाही. कोरोनाचे नियम पाळून अभ्यासिका सुरू केल्या, तर विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल

books
तिघांवर काळाचा घाला; सिन्नर-शिर्डी रस्त्यावर भीषण अपघात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com