
Nashik News : पाथर्डी भागात दोघांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ
Nashik Crime News : पाथर्डी परिसरात दोन घटनांत दोघांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नारायण कांबळे (३०, रा. स्वराज्यनगर) हा त्याच्या आई- वडिलांसमवेत येथील एका इमारतीमध्ये वॉचमन म्हणून राहत होता.
आई- वडील सोसायटीत वॉचमन काम करत असून संतोष हा सेंट्रींग काम करत होता. (Excitement after two dead bodies found in well in Pathardi area Nashik News)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दोन ते तीन महिन्यापूर्वी कौटुंबिक वादातून पत्नी सोडून गेल्याने संतोष हा व्यसनाधीन होता. रात्री उशिरापर्यंत संतोष हा घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. त्याच भागात राहणारा संतोषचा भाऊ बाळू कांबळे यांनीदेखील सर्वत्र परिसरात शोध घेतला पण तो कुठेही दिसून आला नाही.
स्वराज्य नगरातच इमारतीच्या पाठीमागील बाजूस कैलास नवले यांची विहीर आहे. सदर विहिरीची मोटर चालू करण्यासाठी कविता मौले गेल्या असता त्यांना एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कळवताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काहींच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढला. सदर मृतदेह संतोष कांबळे यांचा असल्याचे आढळून आले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
याबाबतची माहिती संतोषचा भाऊ बाळू कांबळे याला देण्यात आली. मानसिक नैराश्यातूनच कदाचित अतिव्यसन करून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत दीपाली संदीप ताजणे (३०, रा. राजीवनगर वसाहत) यांचा दुपारी दीड वाजेच्या सुमारास राजाराम डेमसे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह मिळून आला. मयत ही मानसिक रुग्ण असल्याचे सदर महिलेच्या वडिलांनी पोलिसांना कळवले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.