ISKCON Chandan Yatra : इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेचा उत्साह! दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Excitement of Chandan Yatra in ISKCON Temple Crowd of devotees for darshan nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beautiful decorations in ISKCON temple on Sunday

ISKCON Chandan Yatra : इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेचा उत्साह! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ISKCON Chandan Yatra : द्वारका येथील श्री श्री राधा मदनगोपाल मंदिरात (इस्कॉन) रविवार (ता. २३)पासून चंदनयात्रेला प्रारंभ झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे, अक्षयतृतीयेपासून पुढील २१ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो.

यानिमित्त खास सजवट केलेली असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. (Excitement of Chandan Yatra in ISKCON Temple Crowd of devotees for darshan nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सध्याच्या काळात उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावतात. अक्षयतृतीयेपासून २१ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करताना पुजारी विग्रहांवर चंदनाचे लेपन करतात.

त्यासाठी सर्व भक्त रोज सकाळी चंदन उगाळून ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करतील. या सेवेसाठी सर्व वयोगटातील भक्त उत्साहाने सहभागी होतात. हा उत्सव वृंदावन व जगन्नाथपुरी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबतच जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरांत हा उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

यानिमित्ताने रविवारी मंदिरातील गाभाऱ्यात विविध प्रकारच्या आंब्याची सजावट करण्यात आली होती. तब्बल ४०० किलोहून अधिक आंब्यांचा वापर यात करण्यात आला होता. नाशिककरांनी उत्सवात सहभागी होऊन विशेष दर्शनासाठी मंदिराला भेट द्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले.

टॅग्स :NashikISKCON temple