हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी मुदतवाढ

textile & Handloom
textile & Handloomesakal

नाशिक : केंद्र शासनाच्या (central government) भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग (Handloom) व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका (Textile Technology Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (Admission) मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली यांनी केले आहे. (Extension for admission in Handloom and Textile Technology Diploma Nashik Education News)

textile & Handloom
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओरिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता ओरिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे १३-१ तसेच वेंकटगिरी येथे २ जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत यापूर्वी १० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु केंद्र शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मुदतवाढ दिली असून, आता इच्छुक उमेदवारांना आपले परिपूर्ण अर्ज ११ जुलैपर्यंत करता येतील. उमेदवारांसाठी अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध करून दिल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली यांनी दिली.

textile & Handloom
अतिक्रमणविरोधी पथक अन् व्यावसायिकांत पाठशिवणीचा खेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com