Nashik News : चिराईत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Avinash ahire
Avinash ahireesakal

Nashik News : चिराई (ता.बागलाण) येथील तरूण शेतकरी अविनाश अहिरे (वय४१) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अविनाश अहिरे यांची (गट क्रमांक ३८) वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे या शेतीवर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते.

बदलते हवामान, अवकाळी पाऊस, बॅंकेचे कर्ज, कांदा पिकाचे घसरते बाजारभाव तसेच शेतीपिकाला भाव मिळत नसल्याने विवंचनेत सापडले होते यामुळे अहिरे यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले होते. (farmer commits suicide after being fed up with constant indebtedness Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Avinash ahire
Nagpur Crime : आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

खाजगी फायनान्स कंपनीचे १ लाख ५० हजार रुपये नातेवाईकांकडून हातउसणवार घेतलेले कर्ज फेडावे कसे शेतात तीन एकर कांदा लागवड केली होती. मात्र अवकाळी पावसाने कांदा शेतातच खराब झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते काल शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली.

गळफास घेतल्याचे आजुबाजूच्या शेतक-यांच्या लक्षात आल्यावर याबाबत कुंटुंबियांना कळविले ग्रामस्थांनी तातडीने जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरूषोतम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला तसेच महसूल विभागाचे तलाठी श्रीकृष्ण तिडके यांनी भेट दिली व वरीष्ठ कार्यालयात याबाबत अहवाल सादर केला जाईल अशी माहिती दिली.

विनायक यांच्यावर नामपुर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. चिराई येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजाई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Avinash ahire
Solapur Crime : आईकडील पैशाच्या वाटणीवरुन जोरदार हाणामारी; पाठीत घातला दगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com