Onion Crisis : कांदा सडला अन् शेतकरी रडला; बळिराजावर साठलेला कांदा सडल्याने फेकून देण्याची वेळ | farmer cried Time to throw onion stockpiled getting rotten by unseasonal rain nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Gets Rotten

Onion Crisis : कांदा सडला अन् शेतकरी रडला; बळिराजावर साठलेला कांदा सडल्याने फेकून देण्याची वेळ

Onion Crisis : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा शेतातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातच शक्य तितका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा काढून तो चाळीत साठवला.

परंतु एक ते दीड महिन्यातच चाळीतला कांदा आता सडू लागल्याने अक्षर: तो फावड्याने उचलून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (farmer cried Time to throw onion stockpiled getting rotten by unseasonal rain nashik news)

एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पीकांचे होत्याचे नव्हते केले. अवकाळीमुळे अनेकांचे कांदे हे शेतातच खराब झाले तर काहींनी अतिरिक्त खर्च करत हे कांदे चाळीत भरले.

मात्र महिना ते दीड महिन्यातच कांदा खराब होत असल्याने संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सध्या मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नुकसान भरपाई न मिळाल्याने पुढील हंगामाची तयारी करायची कशी हा प्रश्‍न बळिराजापुढे आहे.

"सध्या कांदा अवघा दोन ते तीन रुपये कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा चाळीतच सडत आहे. आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पेरणीसाठी खते बियाणे खरेदीसाठी भांडवल सुद्धा राहिलेले नाही."

-दिनेश म्हसदे, कांदा उत्पादक शेतकरी,

टॅग्स :NashikFarmeronion crisis