Nashik News : सराड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Savliram bhoye
Savliram bhoyeesakal

सुरगाणा (जि. नाशिक) : सराड येथे रविवारी (ता.१९) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये (वय ७०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी सावळीराम भोये हे आपल्या शेतात घरातील कोणालाही न सांगताच सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. यात अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Farmer dies due to lightning in Sarad Nashik News)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Savliram bhoye
Crime News : धक्कादायक! मध्यरात्री स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सायंकाळी घरच्यांनी शेतात व परिसरात शोधाशोध केली असता ते आढळून आले नाहीत. त्यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत सकाळी घरी परत येतील, असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्ड्यात गवत झुडपात त्यांचा मृत्यदेह आढळून आला.

त्यांच्या डोक्याला व अंगावर वीज पडून भाजल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन भोये यांचे ते वडील होते.

Savliram bhoye
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com