
Nashik Crime News : कौटुंबिक वादातून शेतकऱ्याचा खून; पत्नीसह मुलांना अटक
चांदवड (जि. नाशिक) : तालुक्यातील वराडी-कुंदलगाव शिवारात किरकोळ कौटुंबिक वादातून शेतकऱ्याचा खून करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी मयत शेतकरी यांची पत्नी, व दोन मुले यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पूनमचंद शिवाजी पवार (43) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण वराडी गाव व परिसर हादरला आहे. (Farmer killed due to family dispute Wife and children arrested Nashik Crime News)
पवार कुटुंबात कौटुंबिक वादातून भांडण झाले होते. या पती पत्नी त नेहमीच वाद होते त्या दिवशी वादाला निमित्त ठरले ते पुनमचंद यांच्या पुतणीचे लग्न. त्याच्या पत्नी व मुलांचा या लग्नाला जाण्यास विरोध असतानाही पुनमचंद पुतणीच्या लग्नाला गेले होते.
लग्न लागल्यानंतर सायंकाळी ते घरी आले असता त्यांचे पत्नी व मुलांसोबत जोरदार भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन हे हाणामारीत झाले. यावेळी पूनमचंद यांना त्यांची पत्नी सुनीता व भूषण व कृष्णा या मुलांनी लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली. श्री. पवार यांना मारहाणीत जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक कैलास वाघ, मंगेश डोंगरे, अमित पवार, बिन्नर, अशोक पवार, जाधव यांनी पंचनामा केला. या खूनप्रकरणी भावराव शिवाजी पवार (52) यांच्या तक्रारीवरून संशयित सुनीता पवार, भूषण व कृष्णा पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
घरात नियमित वाद
पुनमचंद शिवाजी पवार (रा.वराडी) हे कुंदलगाव शिवारातील आपल्या शेतात राहत होते. अनेक वर्षांपासून पती-पत्नीत कौटुंबिक वाद होता. पुनमचंद यांना दारुचे व्यसन असल्याने कुटुंबात नेहमीच वाद होता.
मात्र काही महिन्यांपासून ते पुन्हा शेती काम करू लागले होते. याचदरम्यान त्यांनी शेतात नवीन घरही बांधले होते. मात्र किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.