Nashik Agriculture News : आदिवासी भागात राब भाजणीस प्रारंभ; भात पेरणी पूर्व मशागत सुरु | Farmer preparing land for upcoming paddy season in area nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers preparing land for upcoming paddy season in  area

Nashik Agriculture News : आदिवासी भागात राब भाजणीस प्रारंभ; भात पेरणी पूर्व मशागत सुरु

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागासह विविध भागात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत गुंतला असून त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणी.

आदिवासी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जून मध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल किंवा मे महिन्यापासूनच सुरू होत असते. (Farmer preparing land for upcoming paddy season in area nashik news)

भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते. पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते. यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाते शिवाय जमीन भूसभूसीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात व नागालीचे रोपे तयार केली जात आहे.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश

आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोचवता छाटून घेतल्या जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असतो.

बळीराजाने पेरणीपूर्व कामांना दिला वेग

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहूल व भाताचे जास्त पीक घेणाऱ्या भागात म्हणजेच पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, हरसुल तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत गुंतला असून त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे.

या भाजणीमुळे भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते. पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून राब भाजणी केली जाते.