
Farmer Protest News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५३ हजार शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यातील शेतकरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्याही क्षणी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उड्या मारतील. या आंदोलनावर शेतकरी समन्वय समिती ठाम असल्याचे सांगण्यात आले.
मंत्रालयातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी (ता. ११) मुंबई नाका पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की व गोपनीय विभागाचे पोलिस निरीक्षक केदारे यांनी आंदोलकांची बैठक बोलावली होती.
बैठकीत आंदोलन करताना अनधिकृत मानवी संविधानिक कृत्याचा अवलंब करू नये, संघटनेमार्फत समर्थक कार्यकर्त्यांमार्फत मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याचे निवेदन दिले आहे. (farmer protest Farmers Coordination Committee is firm on agitation in Ministry nashik news)
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या. या नोटिशीत पोलिस प्रशासन मंत्रालयामार्फत परवानगी मिळाल्यास मंत्रिमहोदयांना तथा संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन द्यावे, शिष्टमंडळाने चर्चा करून प्रश्न सोडवावा, तसेच असे न केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले.
आंदोलकांतर्फे भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, धोंडिराम थैल सहभागी झाले होते. गेल्या १०३ दिवसांपासून धरणे आंदोलन, उपोषणाच्या मागणीचे निवेदन दिले आहे. याची शासनाने दखल न घेतल्याने आम्हाला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील आंदोलन करावे लागत आहे. शासनाला आमच्याशी चर्चा करावयाची असेल, तर चर्चेसाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, आपण तसा शासनाशी संपर्क करावा, असे आंदोलनकत्यांनी सांगितले.
यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पत्की यांनी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनास देतो, आपण असे काही करू नये, असे सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधीनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. मंत्रालयातील आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
शासनाने आमचा प्रश्न दहा दिवसांत न सोडवल्यास जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांपैकी कोणताही शेतकरी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उड्या घेऊन शासनाचा निषेध करेल, असे सांगण्यात आले.
शेतकरी संघर्ष संघटना व शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे व जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, धोंडिराम थैल, समिती सदस्य रामराव मोरे, दगाजी अहिरे, सुनील पवार, मांगो कापडणीस, गंगाराम शिंदे, खंडेराव मोगरे, सोमनाथ सहाणे, विश्वास कापडणीस, प्रभाकर थोरात, वसंत येवतकर, भारत गाडेकर आदी उपस्थित होते.