पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे; पावसाची प्रतीक्षा

पावसांचे काय गणित राहील, याने शेतकरी चिंताक्रांत आहे.
farmer waiting for rain
farmer waiting for rainesakal

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात दोन दिवस मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावत दमदार सुरवात केली. परंतु परत पावसाने लहरीपणा दाखवत पोबारा केला. त्यामुळे आता पावसांचे काय गणित राहील, याने शेतकरी चिंताक्रांत आहे. दिंडोरी तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तालुक्यांसह मनमाड, येवला, निफाडलाही येथील धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. सध्या धरणांतील पाणी साठ्यात मोठी घट झाल्याने तोही चिंतेचा विषय आहे.

दोन दिवस पावसाने दिंडोरी तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाच्या खरिपावरील अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी खरीप हंगामाला उशीर होईल यामुळे भयभीत झाला आहे.

farmer waiting for rain
Corona बदलत्या व्हेरिएंटविरोधात त्रिसूत्रीच ठरणार उपयुक्त

जून अर्धा संपत आला, परंतु अजून दमदार पाऊस न पडल्याने व जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. तालुक्यात मागील वर्षाचा अंदाज जर घेतला तर यंदा सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मुगाला मोठी पसंती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु सध्या तालुक्यातील पेरणी तपशील जर पाहिला तर अंदाजे दहा टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम रब्बीवरसुद्धा उत्पन्न घटीवर होईल. दिंडोरी तालुक्यात दोन दिवस पाऊस झाला. परंतु त्यांचा शेतीला उपयोग न होता. नुकसानच झाले. अनेक झाडे निखळून पडली, विजेचे असंख्य खांब जमीनदोस्त झाली. त्यामुळे गावे अंधारात होती. तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु जमिनीत ओलावा नसल्याने यंदा भाताच्या आवणीला विलंब होणार आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी घटल्याने तोही एक चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्गाला आता जोरदार पावसांची प्रतीक्षा आहे.

farmer waiting for rain
लग्नाची हौस तरी किती, अकरा पती झाल्यानंतर बाराव्याचा सुरुय शोध

दिंडोरी तालुक्यातील धरणांची पाणी साठा स्थिती :-

१) करजंवण : ६.५० टक्के

२) वाघाड :- २.६६ टक्के

३) पुणेगाव :- ६.६८ टक्के

४) तिसगाव :- ०.७७ टक्के

५) ओझरखेड:-२५.४३ टक्के

६) पालखेड :- २९.४३ टक्के

गेल्या वर्षी दिंडोरी तालुक्यात ८९० मिलिमीटर पाऊस झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com