Farmer Agitation: शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ CMच्या भेटीसाठी रवाना; शेतकऱ्यांचे समृद्धी वरील आंदोलन स्थगित | Farmers delegation leaves for CM visit Agitation on farmers prosperity suspended nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation

Farmer Agitation: शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ CMच्या भेटीसाठी रवाना; शेतकऱ्यांचे समृद्धी वरील आंदोलन स्थगित

Farmer Agitation : समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुसंगवाडी येथे महामार्गावर येत उपोषण आंदोलन करण्या चा इशारा दिला होता.

मात्र पोलीस प्रशासन व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या शेतकऱ्यांची समजूत घालण्यात आली व शिर्डी येथे थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देण्याचे मान्य करण्यात आल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. (Farmers delegation leaves for CM visit Agitation on farmers prosperity suspended nashik news)

समृद्धी महामार्ग लगत शेतकन्यांना ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी १० फूट रुंदीचा वहिवाट रस्ता मिळावा, समृद्धी महामार्ग चे काम चालू असताना वेगवेगळ्या अपघातांमध्ये तालुक्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या नोकरीमध्ये संधी देणे, अडवले गेलेले पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत करून शेतजमिनीचे होणारे नुकसान टाळणे,

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या स्थानिक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून देणे या प्रमुख मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुसंगवाडी चे सरपंच कानिफनाथ घोटेकर,

कहांडळवाडीचे माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, भास्कर कहांडळ फुले नगरचे नितीन आत्रे या शेतकऱ्यांनी शुक्रवारी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी सरकारचा निषेध नोंदवत उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळपासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह परिसरातील अनेक जण दुसंगवाडी येथे समृद्धी महामार्गावर येऊन थांबले होते.

मात्र वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, उपनिरीक्षक विजय सोनवणे, रामनाथ तांदळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना महामार्गावर येण्यापासून रोखले. मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहिल शेख

यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व दंगा नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या आंदोलन स्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी उपअभियंता निंबादास बोरसे यांनी आंदोलन करता शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या व शासन स्तरावरून करण्यात येणारे प्रयत्न याबाबत माहिती दिली.

मात्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेले उत्तर केवळ कागदी घोडे नाचणारे असल्याचे सांगत डॉक्टर शिंदे व त्यांचे सहकारी आंदोलनावर ठाम होते. यावेळी मध्यस्थीचा तोडगा काढत सहाय्यक निरीक्षक लोखंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या माध्यमातून अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांची संवाद साधला व आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेटीची वेळ निश्चित केली.

यानंतर उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना घेऊन सहाय्यक निरीक्षक श्री लोखंडे स्वतः शिर्डी कडे रवाना झाले.