Tomato Price Fall : टोमॅटोला फक्त 2 रूपये भाव! संतप्त शेतकऱ्यांनी ओतला पीकअपभर टोमॅटो

Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik news
Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik newsesakal

Nashik News : विविध संकटांचा सामना करत मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो तर प्रति क्रेट ४० ते ६० रुपये दर मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बाजार समितीतच टोमॅटो ओतून निषेध केला. (Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik news)

या दरातून वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाजार समितीतच टोमॅटो ओतून देण्याची वेळ बळीराजावर आल्याने त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका करीत दर पाडण्यामागील षडयंत्राची संबंधितांनी दखल घ्यावी आणि न्याय द्यावा असे आवाहन केले आहे.

शेतकरी हा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी घेरलेला आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे औषधाचा वाढणारा खर्च आणि लागणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.

नाशिक बाजार समितीत गुजरात, पंजाब, राजस्थान, बंगळुरू, दिल्लीस माल जात असतो. तेथून येणारी मागणी घटल्याने आता तेही जाणे बंद झाल्याने व मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे सांगण्यात येते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik news
NMC News : अधिकाऱ्यांचा सुमार दर्जा ‘क्वालिटी सिटी’ च्या मुळावर! उपक्रमाची कल्पना अडचणीत

गतवर्षी उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली. तसेच परराज्यातून असलेली मागणी घटली. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटोला प्रति क्रेट (२० किलो) ४० ते ६० रुपये दर मिळत आहे यामुळे शेतकरी अक्षरशः हताश झाला आहे.

नाशिक बाजार समितीत सटाणा, दिंडोरी, कळवण, वणी, गिरणारे, सिन्नर, नायगाव, बाभळेश्वर, म्हाळुंगी या भागातून दैनंदिन दहा ते बारा हजार क्रेट टोमॅटो माल विक्रीसाठी दाखल होत आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी माल बाजार समितीच्या आवारात व रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला.

मार्केट बंदमुळे स्थिती

गिरणारे, पिंपळगाव, खारेफाटा हे लोकल मार्केट बंद असल्याने नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आवक वाढली. अमावस्या असल्याने गुजरात अहमदाबाद मार्केट बंद आहेत, मालाला उठाव मिळाला नाही, यामुळे बाजारभाव कोसळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानी पेठ रोडवरील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावरच आणलेला टोमॅटो रस्त्यावर ओतून दिला.

Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik news
Water Crisis : गंगापूर धरणात चर खोदणार! पाणीटंचाईच्या झळा; 12 टँकरने शहराला पाणीपुरवठा

"गतवर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली. यामुळे उत्पादन ही वाढले. मात्र परराज्यातील मालाची मागणी घटल्याने दर कमी झाले असून माल फेकून देण्याची वेळ आली आहे. मी स्वतः दोनशे क्रेट टोमॅटो आणलेला होता. मात्र उत्पादन खर्च, गाडी भाडे, मजुरी, हमाली याचे पैसे देखील बाजारभावातून मिळत नाही." - महेश सोनवणे, शेतकरी, सटाणा.

"बाजार समितीच्या आवारात यावर्षी उन्हाळ्यात टोमॅटोची अवाक वाढल्याने तसेच इतर बाजारपेठत टोमॅटोची मागणी नाही. त्यामुळे व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करून काय करतील? शेतमालाला भाव न देण्यामागे व्यापाऱ्यांचा कोणताही फायदा नाही." - संदीप पाटील, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती, नाशिक.

Farmers protest by throwing tomatoes in market committee as price of tomatoes was Rs 2 per kg nashik news
Nashik News : उंटांना नेण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com