Kisan Long March : लॉन्ग मार्च स्थगित झाल्यानंतर शेतकरी रेल्वेने नाशिकला दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers who arrived by train after the suspension of the Long March

Kisan Long March : लॉन्ग मार्च स्थगित झाल्यानंतर शेतकरी रेल्वेने नाशिकला दाखल

नाशिक रोड : नाशिक ते मुंबई पायी काढण्यात आलेला लॉन्ग मार्च स्थगित झाल्यानंतर शेतकरी पुन्हा नाशिकला परतले शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी रेल्वेची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.

रेल्वेने आलेले शेतकर्यांना नाशिक रोड रेल्वे स्थानकापासुन त्याचा गावी तालुक्यात जाण्यासाठी खास बससेची व्यवस्था करण्यात आली. या लॉन्ग मार्चमध्ये पुरुष शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत्या. (Farmers reached Nashik by train after suspension of Kisan long march nashik news)

यावेळी २१०० शेतकर्यांना ४५ बसेसमधून पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी आदि तालुक्याच सोडण्यात आले. यावेली उपजिल्हाधिकारी स्वाती, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, पेठचे तहसीलदार संदीप भोसले, दिंडोरी प्रांत नीलेश अप्पर आदि अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांचे कडून जेवनाचे डबे व पिण्याचा पाणी वाटप करण्यात आले.

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढला होता. यानंतर हा लॉन्ग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहचला असून लॉंग मार्च दरम्यान एका आंदोलक शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

त्यानंतर या शेतकरी आंदोलनाचे नेते व माजी आमदार जे. पी. गावित आणि माकप आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलनाचे नेते व माजी आमदार जे. पी. गावित यांनी आम्ही आमचा लॉन्ग मार्च स्थगित करत आहोत आशी घोषणा केली.

आमच्या लॉन्ग मार्चला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मार्च संपणार नाही अशी आमची भूमिका होती. त्याप्रमाणे आमची सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली.

या चर्चेत जवळजवळ ७० टक्के मागण्या राज्य सरकारने आमच्या समोर मान्य केल्या.तर उर्वरित मागण्या काही दिवसांमध्ये पूर्ण होतील आसे आश्वासन मिळाल्यानंतर लॉन्ग मार्च मधील सहभागी शेतकरी पुन्हा आपल्या गावाकडे परतले. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी रेल्वेची व बसेसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.