Nashik News : शेततळ्यात बुडून महिला ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

nanda chatur
nanda chaturesakal

Nashik News : सिन्नर तालुक्यातील मीठसागरे येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. नंदा योगेश चतुर (32) यांचा स्वतःच्या शेतातील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

शेततळ्यात पाणी भरण्यासाठी डोंगळा (पाईप) टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला व शेततळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितले. (Female village panchayat member dies after drowning in farm Nashik News)

शेततळ्यातील पाणी पातळी खाली गेल्यामुळे त्यात पाणी भरण्यासाठी सकाळी लवकर उठून सौ. नंदा चतुर शेततळ्याकडे गेल्या असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. शेती कामासाठी दररोज सकाळी लवकर उठण्याची त्यांना सवय होती.

शेततळ्यात पाणी भरण्यासाठी डोंगळा टाकत असताना त्यांचा तोल जाऊन त्या तळ्यात पडल्या असाव्या. यावेळी परिसरात मदतीसाठी कोणीही नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत त्या घराकडे परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली.

आजूबाजूच्या वस्त्यांवरील नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र संशय बळवल्याने काही नातेवाईक शेततळ्याकडे गेले असता पाण्यात बुडालेले अवस्थेत सौ. नंदा चतुर यांचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nanda chatur
Bhiwandi Crime : पत्नी झोपेत असताना पतीकडून लाकडाने प्राणघातक हल्ला; हॉस्पिटलमध्ये सोडून गेला निघून

त्यांचे पती योगेश चतुर यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार दशरथ मोरे, सोमनाथ इल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मीठसागरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ. नंदा चतुर या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सरपंचपद महिला राखीव असल्याने रोटेशनप्रमाणे त्यांना देखील सरपंच पद भूषवण्याची संधी मिळणार होती. मात्र पूर्वीच काळाने घाला घातला. त्यांचे पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे.

nanda chatur
Pune Crime: धक्कादायक! वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com