Nashik : शहरातील १०६ चार्जिंग स्टेशनला अंतिम रुप

charging station
charging stationesakal

नाशिक : हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी देशात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोलपंपाप्रमाणे ठिकठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सोय करण्यासाठी धोरण राबविले जात आहे. महापलिका पीपीपी तत्त्वावर चार्जिंग स्टेशन (Charging Stations) उभारणार आहे. (Finalization of 106 charging stations in city for electric vehicles Nashik News)

राज्य शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार वाहनांच्या बॅटरी चार्जिंग व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे. महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा निश्चित केल्या आहेत. नगररचना विभागाने जागा निश्चितितेला हिरवा कंदील दिल्याने शहरात १०६ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. चार्जिंग स्टेशन्साठी लागणारी जागा, चार्जिंग किट संख्या, चार्जिंग क्षमता आदी बाबींचा मास्टर प्लॅनमध्ये समावेश राहणार आहे. नगररचना विभागाचे सर्व्हेक्षण पूर्ण होऊन प्रस्ताव अंतिम करण्यासाठी विद्युत विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी

राज्य शासनाने पर्यावरणपूरक वातावरणासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता दिल्याने १ एप्रिलपासून २०२२ पासून शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये वाहन खरेदी करताना इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करावी लागणार आहे. शहरात वाढत्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी जागोजागी स्टेशन उभारावे लागणार आहे. तसेच २५ पेक्षा अधिक सदनिका असलेल्या इमारतींच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारण्याची जबाबदारी विकासकांवर टाकली आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून पार्किंग लॉटसच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या जागांचे नकाशे, तसेच इतर बाबी पडताळणीचे काम नगररचना विभागाकडे देण्यात आले होते. त्यानुसार त्यासाठी जागा निश्चितीसाठी नगररचना विभागाने सर्वेक्षण करून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी १०६ जागा निश्चित केल्या आहेत.

विभाग चार्जिंग स्टेशन

पंचवटी २५

नाशिक रोड १८

नाशिक पूर्व १९

नाशिक पश्चिम ०७

सिडको २५

सातपूर १२

charging station
Nashik : पूरस्थितीत अतिरिक्त बससेवा राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन

"शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनच्या जागा निश्चितीनंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. जागा निश्चितीसाठी प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठविला आहे. नगरविकास विभागाकडून मान्यता आल्यानंतर लागलीच चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया गतिमान होईल."

- उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

charging station
वाहतूक कोंडीने कोंडला श्‍वास; मनमाडकरांना रोजच मन:स्ताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com