Nashik Fraud Crime : 'त्या’ व्यापाऱ्याविरूद्ध अखेर ठकबाजीचा गुन्हा

Fraud crime
Fraud crimeesakal

Nashik Fraud Crime : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापाऱ्याने पाठवलेल्या २५ टन कांद्याच्या मोबदल्यात त्याची ५ लाख २१ हजार ९७३ रुपयांची रक्कम तीन वर्षे उलटूनही न देता फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Finally a fraud case against market committee businessman Nashik Fraud Crime)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Fraud crime
Nashik Crime News : कार्ड स्वाइप करत लांबविले 6 लाख; नांदगावच्या माजी आमदारपुत्रावर गुन्हा दाखल

उत्तम पालवे (५२, रा. विजयनगर, सिन्नर) गुडगाव हरियाणा येथील व्यापारी कृष्णा कौशिक यांना ५० किलो वजनाच्या ५२८ गोण्यांमधून २५ टन ४१३ किलो कांदा विक्रीसाठी पाठवला होता. संशयित कृष्णा याने कांद्याचे ५ लाख २१ हजार ९७३ रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने पालवे यांनी सिन्नर पोलिसात व्यापाऱ्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित कृष्णा कौशिक (रा. खांडसा, गुडगाव हरियाणा) याच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करत आहे.

Fraud crime
Nashik Crime News: कर्ज 6 लाख, घेतले 7 अन्‌ मागणी 40ची; अवैध सावकाराविरोधात गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com