कुटूंबीय लग्नाच्या आनंदात; आगीने उध्वस्त केला सारा संसार

Fire
Fireesakal

कोकणगाव (जि. नाशिक) : शिरसगाव ता. निफाड येथे आज (ता. १७) रोजी जीवरक वस्तीवर लग्नघरास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.

शिरसगाव- सुकेणे रस्त्यावर सूर्यभान पंढरीनाथ जीवरक यांची वस्ती आहे. आज (ता.१७) रोजी त्यांच्या नातीचा विवाह येथून जवळच दोनशे फुटांच्या अंतरावर आयोजित केलेला होता. या सोहळ्यात सर्व कुटुंब दंग असतांना दुपारी एक वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काही पाहुण्यांच्या लक्षात आले. सर्व उपस्थित पाहुण्यांनी आणि जीवरक कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेत सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रा. भाऊसाहेब जीवरक यांनी सांगितले.

Fire
''शिवचरित्राने प्रत्येकाच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो''

''आमच्या घरात लग्न असल्याने सर्व कुटूंबीय लग्नात व्यस्त होते. याचवेळी घराला आग लागल्याने नुकसान झाले असून घर संपूर्ण जळून खाक झाले आहे. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.'' - प्रा. भाऊसाहेब सुर्यभान जिवरक

Fire
नाशिक Viral Video : दुचाकीला कारची धडक, महिलेला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com