नाशिकच्या गडकोट, टेकड्यांच्या परिसरात वणव्याचा कहर; रामशेज दुसऱ्यांदा भक्षस्थानी

Fire
FireSYSTEM

गिरणारे/गंगापूर (नाशिक) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वणव्याचा कहर नाशिकच्या सह्याद्री गडकोट, डोंगर, टेकड्यांच्या परिसरात सुरू आहे. जैवविविधतेचे अतोनात नुकसान करणारा वणवा महिनाभरात ब्रम्हगिरी, चामरलेणी पायथा, मायना डोंगर परिसर, तसेच दोनदा रामशेजला लागला. राज्य शासनाच्या वन पर्यावरण विभागाच्या वनवामुक्त अभियानाला यामुळे खीळ बसली असून कागदावर असलेले हे अभियान कुचकामी ठरले आहेत. हेच वाढत्या वनव्याच्या घटनांमुळे दिसत आहे, अशी तक्रार शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने केली आहे. याबाबत वन व पर्यावरण मंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली आहे.

Fire
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून नाशिकच्या व्यावसायिकाची फसवणूक? गुन्हा दाखल

शुक्रवारी (ता. १८) दुपारी लागलेला वणवा पुन्हा रामशेजच्या पश्चिम पायथ्याचा वणवा थेट किल्ल्याच्या मध्य माथ्यापर्यंत पोचला. याची खबर मिळताच शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून वनविभागाचे कंट्रोल, उपवनसंरक्षक व वनरक्षक,स्थानिक युवक व दऱ्यादेवी पर्यावरणाचे शिवाजी धोंडगे, वृक्षवल्लीचे सागर घोलप, तुषार पिंगळे यांना संपर्क केला. तत्पूर्वी वनविभागाचे वनरक्षक अशोक काळे व सहकाऱ्यांनी वणवा थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रात्री हा वणवा किल्ल्याच्या पश्चिमेला मध्यावर गेल्याने तसेच सण असल्याने स्थानिक मदती अभावी अडचण झाल्याचे कळताच वृक्षवल्लीचे सागर शेलार व सहकाऱ्यांनी दुर्गसंवर्धकानी मोठी शिकस्त करून वणवा रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणला.

Fire
दोद्धेश्वरला बिबट्याचा मुक्तसंचार; पंचक्रोशीत भीतीचे वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com