'भाईजान'च्या एंट्रीला चित्रपटगृहात केलेली आतषबाजी भोवली! | Malegaon

salman khan
salman khanesakal

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील सुभाष चित्रपटगृहात अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या ‘अंतिम’ (antim movie) या चित्रपटाच्या शुक्रवारी झालेल्या अखेरच्या शोला जोरदार आतषबाजी करण्यात आली. चित्रपटगृह व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. नेमकं प्रकरण काय?

चित्रपटगृहातील आतषबाजी भोवली

चित्रपटगृहातील आतषबाजी मोठ्या अग्निकांडास निमंत्रण देणारी ठरू शकते. तसेच यामुळे प्रेक्षकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही निष्काळजीपणे चित्रपट सुरू असताना फटाके फोडल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यापूर्वी छावणी पोलिसांनी रिजवान मोहंमद याला ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले होते. तोकडे कलम लावल्याने शहरात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांना आळा बसणार नव्हता. ही बाब लक्षात घेऊन सुभाष चित्रपटगृह भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या तिसगे यांच्या तक्रारीवरून आतषबाजी, सामान्य प्रेक्षकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील चित्रपटगृहात होणाऱ्या आतषबाजीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

या प्रकरणी रिजवान मोहंमद रमजान (वय २४, रा. शाहीन पार्क) व अजीम शेख निराम (२४, रा. गुलाब पार्क, फरान हॉस्पिटलमागे) या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली. या दोघा संशयितांविरुद्ध चित्रपटगृह व्यवस्थापक सुरेंद्र तिसगे यांच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.

salman khan
ऐन महागाईत मटण-राइस प्लेट चक्क अडीच रुपये; राइस दीड रुपया!

सलमानची फॅन्सना विनंती

दरम्यान सलमान खानने त्याच्या फॅन्सला अशा गोष्टी न करण्यासाठी विनंती केली आहे. सलमानने सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांनी असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे

यापूर्वीही कारवाई

काही वर्षांपूर्वी मोहन चित्रपटगृहात असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, नागरिकांच्या जीवितास धोका, चित्रपटगृहाची इमारत जळण्याची शक्यता यांसह विविध कठोर कलमे लावून काही तरुणांविरुद्ध कारवाई केली होती. त्या वेळी या तरुणांना पोलिस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर या प्रकारांना काही काळ आळा बसला होता.

salman khan
Omicron वर बायोएनटेक आणणार प्रभावी लस! दिलासादायक बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com