अहिराणी संगीत क्षेत्रात ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न!

First ahirani rap song in baglan
First ahirani rap song in baglanSYSTEM
Summary

काहीतरी जगावेगळे करण्याच्या इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली, तर निश्चितच जगावेगळे घडते. बागलाण तालुक्यातील युवा गायक महेश पाटोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. एकाच रिदममध्ये पाहायला मिळणाऱ्या अहिराणी संगीताला त्यांनी ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे.

सटाणा (जि. नाशिक) : काहीतरी जगावेगळे करण्याच्या इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली, तर निश्चितच जगावेगळे घडते. बागलाण तालुक्यातील युवा गायक महेश पाटोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. एकाच रिदममध्ये पाहायला मिळणाऱ्या अहिराणी संगीताला त्यांनी ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे. ‘वेस्टर्न बिट्स’ आणि अहिराणी भाषेचा सुरेल मिलाप असलेले पाटोळे यांनी स्वत: गायलेले बागलाण तालुक्यावर आधारित पहिले अहिराणी रॅप साँग नुकतेच रसिकांच्या भेटीला आले आहे. अहिराणी संगीताचा हा नवा पॅटर्न तरुण वर्गासह रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला असून, प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसांत हजारो प्रेक्षकांच्या लाइक्सही मिळाल्या आहेत. (First-ahirani-rap-song-in-baglan-nashik-entertainment-news)

अहिराणी संगीताला ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड

युवा गायक महेश पाटोळे यांनी या रॅप साँगच्या माध्यमातून अहिराणी संगीताला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. यात गायक, निर्माता व अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ही काम केले आहे. यापूर्वी त्यांनी बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या जीवनचरित्रावर ‘देव मना मामलेदार...’ या अहिराणी गीताची निर्मिती केली असून, त्या गीतालाही रसिकांनी विशेष पसंती दिली होती. आजच्या काळात तरुणांमध्ये रॅप साँगचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे आपली मातृभूमी असलेल्या बागलाण तालुक्याला रॅप साँगद्वारे जगभरातील रसिकांपर्यंत पोचवावे, असा निश्चय करून पाटोळे यांनी या अहिराणी गीताची निर्मिती केली. त्यात त्यांनी अहिराणी संगीताला ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे.

First ahirani rap song in baglan
परदेश शिष्यवृत्ती घ्यायचीय? अर्जाची मुदत वाढविली

सोशल मीडियावर धुमाकूळ

गीतात अहिराणी भाषेत तालुक्यातील ठळक वैशिष्ट्यांसोबत विविध ठिकाणांचे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. दिग्दर्शन व चित्रीकरण चाणक्य पाटील, गाण्याची शब्दरचना तुषार शिल्लक (मालेगाव), संगीत सुजित पाटील, तर दीपक महाजन यांनी संकलन केले आहे. गाण्यातील मुख्य नायकाची भूमिका पाटोळे यांनीच केली आहे. यू-ट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या गीताला अवघ्या सहा दिवसांतच २५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी बघितले असून, हजारो लाइक्सचा पाऊसही पडला आहे. सध्या सोशल मीडियावर हे गीत धुमाकूळ घालत आहे.

(First-ahirani-rap-song-in-baglan-nashik-entertainment-news)

First ahirani rap song in baglan
10 हजारांची लाच मंडलाधिकाऱ्याला पडली महागात! रचला सापळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com