नवे निरपूरचे आजी-माजी सरपंच बनले कोरोनाकाळातील देवमाणूस!

corona warrier
corona warrieresakal

सटाणा (जि.नाशिक) : ‘मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा’ समजून जीवाची पर्वा न करता कोरोनाकाळात स्वत: पदरमोड करून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये देव पाहणारे दोन तरुण सध्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. समाजानेच त्यांना ‘देवमाणूस’ ठरविले. ते म्हणजे नवे निरपूर (ता. बागलाण)चे लोकनियुक्त सरपंच शरद (मुन्ना) सूर्यवंशी व माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी. (former-sarpanch-helps-in-Corona-period-nashik-marathi-news)

मुन्ना आणि भाऊसाहेब सूर्यवंशी या जोडगोळीचे एक आगळेवेगळे काम

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, की त्याची हेळसांड सुरू होते. खबरदारी म्हणून लगेच त्याला गृहविलगीकरणात ठेवून तो परिसर कन्टेन्मेंट झोन करणे ठरलेलेच असते. रुग्णांची रवानगी कोविड सेंटरमध्ये किंवा दवाखान्यात झाली, की त्याची घरवापसीसुद्धा रामभरोसे असते. कोरोनाकाळातील स्मशानशांतता, रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न आणि रुग्ण, नातेवाइकांची होत असलेली हेळसांड हा चलचित्रपट ठरलेला. अशा या भयाण स्थितीत बोटावर मोजण्याइतके लोक या जीवघेण्या प्रक्रियेत सेवाभावाने प्रेरित होतात. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने नवे निरपूरच्या मुन्ना आणि भाऊसाहेब सूर्यवंशी या जोडगोळीने एक आगळेवेगळे काम उभे केले आहे.

कोरोनाला घाबरू नका. तो बरा होणारच,

कोरोनाला घाबरू नका. तो बरा होणारच, ही सकारात्मक भावना ग्रामस्थांमध्ये रुजविण्याचे पहिले काम त्यांनी सुरू केले. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्याचे काम ते दोघे करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि औषधांचा तुटवडा वाढला आणि मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी वाढली. बेड मिळत नाही म्हणून अनेकांनी घरीच उपचाराची सोय करण्यास सुरवात केली. त्यातच कोरोनाच्या भीतीने सगेसोयरे मदत करायला पुढे येत नाहीत. अंत्यविधीसाठीही धजावत नाही. हे पाहून सरपंच मुन्ना सूर्यवंशी आणि माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधितांना मदत करण्याचे ठरवले. गावात कुणी आजारी पडला, तर त्याच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करून आवश्यकता भासल्यास सुरक्षितता बाळगून आपल्याच वाहनातून बाधित रुग्णाला शहरात तपासणीसाठी घेऊन जाणे. त्यांचे चारचाकी वाहन म्हणजे एक रुग्णवाहिकाच झाली. बाधितांवर मोफत औषधोपचारही ते करतात. कोरोना रुग्णांना तत्काळ मदत मिळावी, या आजाराबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी सोशल मीडियावर तयार केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना योग्य मदत मिळते. कुणाचाही संदेश या दोघांपर्यंत पोचताच ते तत्काळ त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. सामाजिक बांधिलकी आणि निःस्वार्थ भावनेने दोघांनी सुरू केलेल्या या कार्याने शेकडो कोरोनाबाधितांचे प्राण वाचले आहेत. यावरच ते थांबले नाहीत, तर ज्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यास नाकारले, त्यांचाही अंत्यविधी या दोघांनी केला. म्हणून त्यांना पंचक्रोशीतील जनतेने ‘देवमाणूस’ ही पदवी बहाल केली. अनेकांच्या मोबाईलवर ‘डीपी’ म्हणून या दोघांच्या प्रतिमा झळकत आहेत. नवे निरपूर आज कोरोनामुक्त झाले. हाच आमचा खरा पुरस्कार असल्याची प्रतिक्रिया उभयतांनी दिली आहे.

corona warrier
नाशिकमध्ये ३८० कोटींचे अनावश्यक भूसंपादन; कोणाचा आशीर्वाद?

कोरोनाच्या केवळ भीतीने अनेकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाबाधितांशी मैत्री करण्याचे धाडस केले. रुग्णाशी गप्पा मारून विश्‍वास संपादन केल्याने त्याच्या मनातील भीती दूर केल्याने रुग्णाचे मनोधैर्य उंचावण्यात मदत झाली. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद औषधोपचारापेक्षाही परिणामकारक काम करतो. -शरद (मुन्ना) सूर्यवंशी, सरपंच, नवे निरपूर

सुरवातीस मी कोरोनाबाधितांना मदत करू लागताच माझ्यापासून काही जण दुरावले. त्याचा विचार न करता बाधितांशी हस्तांदोलन करीत अनेकांच्या मनातील भीती दूर केली. बाधितांच्या अंत्यविधीला नातेवाईक चार हात दूर असताना आम्ही सर्व विधी, सोपस्कार पार पाडत होतो. त्यातूनही ऊर्जा मिळत गेली.

-भाऊसाहेब सूर्यवंशी, माजी सरपंच, नवे निरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com