corona second patient.jpg
corona second patient.jpg

ब्रेकिंग : नाशिकमध्ये कोरोनाचे ४९ संशयित रुग्ण दाखल..आयुक्तांची माहिती

नाशिक : शहरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने गोविंद नगर भागातील मनोहर नगर मध्ये 22 पथकांच्या माध्यमातून शोधमोहिम सुरु केली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सतरा अतिजोखमीच्या व्यक्तींना महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचबरोबर दिल्लीहून परतलेल्या 19 व औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले चौघे असे 23 व्यक्तींना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोधमोहीमेत आढळून आलेल्या नऊ संशयितांसह एकुम 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शोध मोहिम

शहरात गोविंद नगर भागातील मनोहर नगर मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर या भागात शोध मोहिम राबविण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात आली त्या व्यक्तीच्या संपर्कातील सतरा व्यक्तींना ट्रॅक करण्यात आल्यानंतर त्यांना महापालिकेच्या कथडा येथील डॉ.जाकीर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. औरंगाबाद शहरात कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आला त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांचा देखील वैद्यकीय पथकाला शोध घेण्यात यश आल्याने त्यांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले.

49 जणांचे स्वॅब पाठविले 

गेल्या दोन दिवसात दिल्लीहून नाशिक मध्ये 19 नागरिक दाखल झाले त्यांचाही शोध घेण्यात आल्यानंतर त्यांनाही संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात कोरोना संशयित म्हणून नऊ व्यक्तींची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात तातडीने दाखल करून घेण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाशी संबंधित 49 व्यक्तींना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com