Nashik News: सापडलेला मोबाईल मूळ मालकास परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik News: सापडलेला मोबाईल मूळ मालकास परत

जुने नाशिक : टाकळी रोड शंकरनगर येथील रहिवासी आसिफ खान यांना स्मार्ट फोन सापडला होता. त्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये चौकशी करत मोबाईलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी त्रिकोणी गार्डन पोलिस चौकीत नियुक्त पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मोबाईल मालकाचा किंवा घरचा अन्य क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. डिजिटल लॉक असल्याने त्यांना तसे करणे शक्य झाले नाही.

त्यांनी मोबाईल तसाच सुरू ठेवत मालकाचा फोन येण्याची प्रतीक्षा केली. दोन तासानंतर मोबाईल धारकाने फोन करत मोबाईल त्याचा असल्याचे सांगितले. श्री. खान यांनी मोबाईल त्यांचाच आहे किंवा नाही याची खात्री केली. तसेच, त्रिकोणी गार्डन पोलिस चौकीत त्यांना बोलावून घेतले.

पोलिसांसमोर खात्री पटल्याने त्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मोबाईल परत करण्यात आला. मोबाईल पडला असल्याचे लक्षात आले नसल्याचे मोबाईल धारकाकडून सांगण्यात आले. आसिफ यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे मोबाईल धारक आणि पोलिसांनी कौतुक केले.

टॅग्स :Nashikpolicemobile