Nashik Crime News : जुगार अड्ड्यावर छाप्यात मालेगावला चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raid on gambling den latest marathi news

Nashik Crime News : जुगार अड्ड्यावर छाप्यात मालेगावला चौघांना अटक

मालेगाव (जि. नाशिक) : येथील गणेशनगर भागात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथील हनीफ लाडला यांच्या घराशेजारील शेख इम्रानच्या घरात जुगार अड्डा सुरु होता.

पोलिसांनी शेख इम्रान शेख आबीद (वय २८), सरजील शेख साजीद (वय १९, दोघे रा. गणेशनगर), रहमान मोहम्मद सुलतान (वय २८, रा. मर्चंटनगर) व शेख उमर शेख आलीम (वय ४६, रा. रमजानपुरा) या चौघांना अटक केली. (Four arrested in Malegaon raid on gambling den Nashik Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शेख हबीब, पापा व अन्य दोन असे चार संशयित फरारी आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना शेख इम्रान याने त्याचे डोके पत्र्याच्या शेडवर आपटण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस शिपाई दिनेश शेरावते व बागुल यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

त्याचवेळी या चौघांना सोडविण्याच्या उद्देशाने दोघा महिलांनी उपनिरीक्षक रुपाली महाजन यांच्या गळ्याच्या खाली नखाने ओरबडले. तसेच, त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी (ता. २५) मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. उपनिरीक्षक रुपाली महाजन यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.