Nashik News : लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four goats killed in wolf attack Nashik News

Nashik News : लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

येवला (जि. नाशिक) : शहरालगत असलेल्या सुकी येथे लांडग्याच्या हल्ल्यामध्ये विठ्ठल आनंद जाधव यांच्या घराजवळ असलेल्या चाळीमध्ये लांडग्यांनी हल्ला करून चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. (Four goats killed in wolf attack Nashik News)

यामुळे परिसरातील शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी पूर्ण बंदिस्त जागा असताना लांडग्याने जमिनीखाली उकरून जाळीच्या खालून लांडग्याने आत प्रवेश करून शेळ्यांना ठार केले आहे. याची माहिती मिळताच माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच, वन विभागाचे कर्मचारी व पंचायत समितीचे पशुसंवर्धनचे डॉ. झाल्टे यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तालुक्यामध्ये लांडग्याच्या हल्ल्या गावागावात वाढत आहे शेतकरी बांधवांनी आपल्या पशूंचे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन सभापती प्रवीण गायकवाड केले.

याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी नागपुरे, राठोड, डॉ. झाल्टे, अरुण जाधव, प्रकाश जाधव, रामकृष्ण जाधव, राजेंद्र जाधव, अनिल जाधव, रामनाथ जाधव, अरुण जाधव आदी उपस्थित होते.