esakal | नाशिकमधील 4 रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी धावाधाव; प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर

बोलून बातमी शोधा

oxygen
नाशिकमधील 4 रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी धावाधाव; प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : रुग्णालयांच्या साखळीतील शहरातील रुग्णालयातून पहाटे पाचला ऑक्सिजनचा शोध सुरू झाला. रुग्णालयात दाखल असलेल्या २२ रुग्णांसाठी दीड ते दोन तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक असल्याची माहिती मिळताच, रुग्णालयातून रुग्णांना कुठे हलवायचे? यासंबंधीची चौकशी सुरू झाली..पण...

लिक्विड ऑक्सिजनचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर

सद्यःस्थितीत शहरातील कुठल्याही रुग्णालयात खाटा मोकळ्या नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण कुठे न्यायचे? या प्रश्‍नाने रुग्णालयाच्या प्रशासनाचे धाबे दणाणले. या रुग्णालयासाठी दोन ड्युरा टँकभर ऑक्सिजन देण्यात आला. अशीच गत शहरातील इतर तीन रुग्णालयांची झाली होती. त्यातील एका रुग्णाला ड्युरा टँक, एका रुग्णालयाला २० सिलिंडर आणि एका रुग्णालयाला दोन टँक ऑक्सिजन देण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या वाढणाऱ्या डोकेदुखीचा प्रश्‍न आजच्या पुरत्या निवळण्यास मदत झाली. लिक्विड ऑक्सिजनचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आज जामनगरमधून २१ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाले. ते दोन उत्पादकांना देण्यात आले आहे.

हेही वाचा: कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात

ऑक्सिजनसाठी धावाधाव

मुरबाडहून लिक्विड ऑक्सिजनचा टँकर न आल्याने बुधवारी (ता. २८) शहरातील चार रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी धावाधाव झाली. अखेर सिन्नरमधील राखीव कोट्यासह कोरोना केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेले ड्युरा टँक उपलब्ध करून देत रुग्णालयांची गरज भागविण्यात आली.

हेही वाचा: मामाने केला विश्वासघात! शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीचे परस्पर लावले लग्न

वापीमध्ये ऑक्सिजनचा शोध

नाशिकच्या खासगी रुग्णालयांतर्फे गेल्या दोन दिवसांपासून वापीमध्ये ऑक्सिजन उपलब्ध होईल काय? यादृष्टीने शोध घेण्यात येत आहे. पण आज गुजरात सरकारने वापीतील दोन्ही उत्पादकांना ऑक्सिजन राज्याला लागेल, असे पत्र पाठवल्याचे तेथील उत्पादकांनी डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सिलिंडर भरणारा जुना बंद असलेला प्रकल्प नाशिकमध्ये हलवता येईल काय? यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.