Breaking : कार झाडावर आदळून मनमाडचे चौघे ठार अन् 1 गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Breaking : कार झाडावर आदळून मनमाडचे चौघे ठार अन् 1 गंभीर जखमी

मनमाड (जि. नाशिक) : येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात मनमाड येथील चार तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे.

या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव ,प्रवीण सकट, गोकुळ हिरे हे जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

हे सर्व जण अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेले होते, मनमाडकडे येताना अपघात हा झाला.

हेही वाचा: नाशिक : मानपानावरून छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

हेही वाचा: नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग

Web Title: Four Killed One Seriously Injured In Car Crash In Manmad Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikaccidentdeath
go to top