Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची आत्महत्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची आत्महत्त्या

नाशिक : शहर परिसरात रविवारी (ता. ५) वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी राहत्या घरांमध्ये गळफास घेत आत्महत्त्या केली. यात दोन तरूणींचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Four suicides in different incidents Nashik News)

आनंदवल्ली परिसरात राजाभैया गढिया कोल (वय २८, रा. प्रिलियम साईटची वसाहत, आनंदवल्ली) याने रविवारी राहत्या घरात छताच्या लोंखडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात नोंद झाली आहे. उपनगर परिसरातील घटनेत निकिता तुकाराम पवार (वय १८, रा. गोस्वामी एनल्केस, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) हिने रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी फॅनला ओढणीने सहाय्याने गळफास लावून घेतला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

तिचा भाऊ समाधान याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसांत नोंद झाली आहे. अन्य दोन घटना पंचवटीत घडल्या.

यामध्ये सपना कमलाकर हिरे (वय २५, रा. उदय कॉलनी, मखमलाबाद) हिने रविवारी दुपारी राहत्या घराच्या किचनमध्ये फॅनला सुती टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

तर विजय उर्फ विजूभाऊ नारायण पगारे (वय ५७, रा. कृष्णनगर, मोरे मळा) यांनी रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. या दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikdeath