रेमडेसिव्‍हिरसाठी मागणीचा पाऊस; तब्बल चार हजार नागरीकांचे ई-मेल

या अजब प्रकारामुळे नियंत्रण कक्षावरील ताण मात्र वाढला आहे.
remedesivir injections
remedesivir injections

नाशिक : रेमडेसिव्‍हिरचा तुटवडा लक्षात घेता, शासकीय निकषांद्वारे आवश्‍यक रुग्‍णांपर्यंत थेट कोविड रुग्‍णालयांना इंजेक्‍शन पुरविले जाते आहे. त्‍याकरीता रुग्‍णालयांनी ई-मेलआयडीवर मागणी नोंदवायची आहे. परंतु ई-मेलआयडीचा संदेश व्‍हायरल झाल्‍याने थेट सुमारे चार हजार नागरीकांनीच या ई-मेलआयडीद्वारे इंजेक्‍शनची मागणी नोंदविली आहे. या अजब प्रकारामुळे नियंत्रण कक्षावरील ताण मात्र वाढला आहे.

वयक्‍तिक ई-मेल न पाठविण्याचे आहवाहन

जिल्‍हा प्रशासनाने जारी केलेल्‍या प्रणालीनुसार थेट कोविड रुग्‍णालयांना रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन उपलब्‍ध करून दिले जाते आहे. त्‍याकरीता संबंधित रुग्‍णालयांनी रोज सकाळी नऊपर्यंत संभाव्‍य इंजेक्‍शनबाबत विहीत नमून्‍यात मागणी नोंदविण्याचे आवाहन केले होते. रुग्‍णालयांसोबत सर्वसामान्‍यांनीदेखील या ई-मेलवर मागणी नोंदविल्‍याने यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्‍णांच्‍या नातेवाईकांनी परस्‍पर वैयक्‍तिक स्‍वरुपातील मागणीचा ई-मेल पाठविल्‍यामुळे नियंत्रण कक्षाचा वेळ वाया जातो आहे. वैयक्‍तीक स्‍तरावर इंजेक्‍शन उपलब्‍ध करून दिले जाणार नसल्‍याचे यापूर्वीच जिल्‍हा प्रशासनाने स्‍पष्ट केले आहे. त्‍यामुळे वैयक्‍तिक स्‍वरूपाचे ई-मेल न पाठविण्याचे आहवाहन घटना व्‍यवस्‍थापक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी केले आहे.

remedesivir injections
अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

रेमडेसिव्‍हिर मागणीसाठी जारी केलेला ई-मेल हा केवळ रुग्‍णालयांकरीता आहे. वैयक्‍तिकस्‍तरावर रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे चार हजाराहून अधिक ई-मेल आले असून, हे अपेक्षित नाही. यामुळे कक्षाचा वेळ जात आहे. रुग्ण किंवा त्‍यांच्‍या नातेवाईकांनी ई-मेलद्वारे मागणी करू नये, वैयक्‍तिक स्‍तरावर कुणालाही इंजेक्‍शन दिले जाणार नसल्‍याची नोंद घ्यावी.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

remedesivir injections
पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com