Crime
Crimeesakal

Nashik Fraud Crime : विकलेल्या सदनिकेवर कर्ज काढून फसवणूक

नाशिक : घर घेताना त्यावर बोजा आहे का हे पाहून घ्या. अन्यथा फसवणूक (Fraud) अटळ आहे. हे सांगणारा प्रकार उघडकीस आला आहे. (Fraud crime by taking loan on sold flat nashik news)

याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार धुळ्यातील दांपत्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक विठ्ठल कोठावदे (५३) सुनीता अशोक कोठावदे (४५, रा. गजानननगर, साक्री (जि. धुळे), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित दाम्पत्याची नावे आहेत.

संशयित कोठावदे दांपत्याचा कामटवाडे परिसरात वावरे एम्पायर अपार्टमेंटमध्ये ए- १०२ हा प्लॅट होता. तो प्लॅट त्यांनी दिनेश रावसाहेब चव्हाण (४३) यांना विकला. प्लॅट विक्रीवेळी त्यावर कुठलाही बोजा किंवा कर्ज नसल्याचे सांगून या दाम्पत्याने दिनेश चव्हाण यांना सदनिका विकली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Crime
Uddhav Thackeray Group : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपनेतेपदी अद्वय हिरे

त्यानंतर चव्हाण संबंधित प्लॅटमध्ये राहायला गेले. मात्र, जेव्हा चव्हाण यांनी संबंधित प्लॅटचा नवीन सातबारा काढला, तेव्हा त्‍यावर धुळे येथील एका पतसंस्थेचे कर्ज असल्याचे दिसून आले. याप्रकरणी २३ लाख ६० हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाच्या आदेशानुसार दोघा दांपत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Nashik Crime News : कारमधून मोबाईल लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com