हज यात्रेच्या नावाने घेतले चक्क दीड कोटी..त्यानंतर...

hajj yatra.jpg
hajj yatra.jpg

नाशिक : मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हज आणि उमराह येथे जाणाऱ्या भाविकांकरिता विमान प्रवासाचे तिकीट काढून देण्याच्या उद्देशाने 739 भाविकांची एक कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील तिघे फरारी झाले आहेत. 2018 मध्ये मुंबई नाका पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी महिन्यात हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. 

असा घडला प्रकार...
अब्दुल मतीन महंमद अजीज मणियार ऊर्फ अब्दुल मतीन अजीज कादरी (रा. 701, पॅरेडाईज हाइट्‌स, वडाळा रोड, नाशिक), अजीज अहमद बनेमिया मणियार, समीर तबरेज हशोमद्दीन मणियार (रा. काजीपुरा, आदमशाह दर्ग्यासमोर, जुने नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. अश्‍पाक रमजान पठाण यांचा टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, ते व त्यांचे इतर भागीदार मिळून व्यवसाय करतात. दरम्यान, 1 ऑगस्ट 2017 ते 1 फेब्रुवारी 2018 पावेतो शहरातील दीपालीनगरच्या अल-खैर टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सकडून नाशिकमधील मुस्लिम भाविकांसाठी हज आणि उमराह येथे जाण्यासाठी संशयितांच्या मदतीने विमान तिकिटे काढण्यात येत होती. संशयितांनी अश्‍पाक पठाण व त्यांच्या भागीदारांचा विश्‍वास संपादन करून 739 भाविकांचे तिकिटापोटी एक कोटी 75 लाख 11 हजार 338 रुपये घेत हज यात्रेकरूंची फसवणूक केली. अल-खैर टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सच्या फर्ममार्फत येणाऱ्या यापूर्वीच्या यात्रेकरूंचे हज आणि उमराहची विमान तिकिटे बुक करून दिली होती. त्यानंतर संशयितांनी फसवणुकीच्या उद्देशाने ही रक्‍कम लाटली.

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग ​

संशयित हजची विमान तिकिटे काढण्यासाठी 40 टक्के रक्‍कम ऍडव्हान्स घेत होते. त्यानंतर 31 दिवसांनंतर तिकिटे झाल्यावर उर्वरित 60 टक्‍क्‍यांची रक्‍कम दिली जात होती. संशयितांनी याच गोष्टीचा फायदा घेत अश्‍पाक पठाण व त्यांच्या भागीदारांचा विश्‍वास संपादन करून पूर्वनियोजित कट रचून वरील रकमेचा अपहार करून फसवणूक केली. सप्टेंबर 2018 मध्ये अश्‍पाक पठाण यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून, तिन्ही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे संशयित फरारी असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने महिनाभरात संशयित न्यायालयासमोर हजर न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com