Nashik Fraud Crime : लकी ड्रॉच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Crime
Crimeesakal

Nashik Fraud Crime : खरवंडी (ता. येवला) येथील तरुण शेतकरी योगेश हरिभाऊ झाल्टे (वय ३५) यांच्या घरी येऊन गेल्या १ फेब्रुवारीस एका अनोळखी भामट्याने लकी ड्रॉच्या नावाखाली बतावणी करून फसवणूक केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी माणिक ज्ञानदेव घाडगे (वय ४१, रा. तनपूरवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यास शिताफीने अटक केली आहे. (Fraud of farmers in name of lucky draw Nashik Crime news)

कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिजनेस प्रा. ली. गृहयोजना या नावाखाली लकी ड्रॉ कुपनवर इलेक्ट्रीक वस्तू, शेती औजारे, ट्रॅक्टर, चारचाकी वाहन, दुचाकी आदी वस्तू मिळतील, अशी बतावणी करत घाडगे याने श्री. झाल्टे यांना दोन कुपन दिले होते.

त्यातील पहिल्या कुपनवर ३०० लिटर फायबर पाण्याची टाकी व दुसऱ्या कुपनवर महिंद्रा विवो ट्रॅक्टर लागल्याचे सांगून ट्रॅक्टरच्या इन्शुरन्सपोटी आगोदर ३५ हजार रुपये भरावे लागतील, त्यानंतर ट्रॅक्टर ताब्यात मिळेल, असे सांगितले.

त्यानुसार झाल्टे यांच्याकडून वीस हजार रुपये रोख घेत उर्वरित पंधरा हजार रुपये फोन पे करण्यास सांगितले. मात्र, बक्षीस म्हणून लागलेला ट्रॅक्टर न देता फसवणूक केली. याबाबत झाल्टे यांच्या तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime
Nagpur Crime : आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांच्या सूचनेनुसार व येवल्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसूल पोलीस चौकी तपास पथकातील पोलीस हवालदार दौलत ठोंबरे, कॉन्स्टेबल गौतम मोरे यांनी बारकाईने तपास करून व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळविली.

मात्र, पोलिस आाल्याची चाहूल लागताच घाडगे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र त्याचा एक साथीदार फरारी झाला आहे. दरम्यान, घाडगे याच्या विरोधात मनमाड, ओझर पोलीस ठाण्यांतही फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

Crime
Crime News : मस्करीची कुस्करी! मित्राने गुदद्वारात हवा भरल्याने कामगाराचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com