इगतपुरीच्या भात उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

Fraud with Igatpuri Rice Producer farmers Nashik News
Fraud with Igatpuri Rice Producer farmers Nashik Newsesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील जवळपास ३२ भात (Rice) उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली. आधीच निसर्गाचे अवकृपेने भात शेती संकटात सापडत आहे. त्यात व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भाव मिळत आहे. नाशिक येथील महाबीज (Mahabij) संघाला कुर्हेगाव येथील ९८१ क्विंटल भात विकला होता. काही दिवसांनी या शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केल्यावर काही शेतकऱ्यांना थोडी फार रक्कम देण्यात आली.

त्यानंतर भाताचे पूर्ण पैसे मागितल्यावर भात चांगला नसून तो तुम्ही परत घेऊन जा, असे उत्तर शेतकऱ्यांना महाबीज संघातर्फे देण्यात आले. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. महाबीज संघाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. याबाबत कुऱ्हेगावचे सरपंच जयराम गव्हाणे यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे जाऊन कैफीयत मांडली.

Fraud with Igatpuri Rice Producer farmers Nashik News
पाणीपुरवठा योजना सुरू करा; अन्यथा पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढू

आमदार हिरामण खोसकर यांनी महाबीज संघाच्या डीएमयाशी बोलून रिजेक्ट केलेला ९८१ क्विंटल भात पास करण्याची सूचना केली. त्यावरून पूर्ण भात पास करून घेण्याचे महामंडळाकडून आश्वासन मिळाले. सरपंच जयराम गव्हाणे, हरिभाऊ गुळवे, मधुकर धोंगडे, पुंजा गव्हाणे, सुदाम धोंगडे, प्रवीण धोंगडे, नवनाथ गव्हाणे, दशरथ धोंगडे, रामु गडकरी, अर्जुन धोंगडे, रामकृष्ण धोंगडे, भगवान धोंगडे, समाधान धोंगडे, संदीप धोंगडे, परशराम धोंगडे, प्रवीण धोंगडे व शेतकरी उपस्थित होते.

Fraud with Igatpuri Rice Producer farmers Nashik News
आसाममध्ये विषारी मशरुम खाल्लाने 16 लोकांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com