Latest Marathi News | मळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; गरुड वस्तीवरील वासरू केले फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Thackeray, Forest Guard, went to the Garuda Vasti and conducted Panchnama.

मळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; गरुड वस्तीवरील वासरू केले फस्त

पंचवटी (जि. नाशिक) : म्हसरूळ शिवारातील आडगाव- वरवंडी रोडवर मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी (ता.२२) मध्यरात्री बिबट्याने गरुड मळे वस्तीतील वासरू फस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . यामुळे संपूर्ण मळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Free movement of leopards in mule area calf on Garud Vasti killed Nashik Latest Marathi News)

वस्तीवरील बंडू बाळासाहेब गरुड यांची शेती आहे. ते दुग्ध व्यवसायदेखील करतात. त्यांच्याकडे चार गायी व तीन वासरू आहेत. त्यातील एका वासरास मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास बिबट्याने भक्ष्य केले. ही बाब शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी गरुड गेले असता, त्यांच्या लक्षात आली.

त्यांना एक वासरू कमी दिसले. त्याचा शोध घेतला असता, मोहन गरुड यांचे उसात मध्यभागी बिबट्याने वासराला ओढून नेले आणि फस्त केल्याचे दिसून आले. याबाबत वनविभागास कळविण्यात आले आहे. दुपारी वनरक्षक राजेंद्र ठाकरे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन गरुड वस्ती व परिसरात पाहणी करून पंचनामा केला.

या मळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढला असून, बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जुलै महिन्यात म्हसरूळ - आडगाव रोडवरील देशमुख वस्तीवर एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला करीत त्यास गंभीर जखमी केले होते. ऑगस्ट महिन्यात मोराडे इस्टेट भागात मोरे वस्तीवर एका युवकावर बिबट्याने हल्ला केला होता, मात्र युवकाने त्यावर प्रती हल्ला करीत आपले प्राण वाचवले होते.

हेही वाचा: Bank Slip भरण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; 40 हजार लंपास

"म्हसरूळ- वरवंडी रोडवरील वस्तीत तीन महिन्यापूर्वी बिबट्याकडून हल्ल्यात वासरू जखमी झाले आहेत. या वेळी आमच्या वस्तीवरील वासरू बिबट्याने फस्त केले आहे. जनावरांवरांसह रहिवासी शेतकऱ्यांवर सुद्धा बिबट्याकडून हल्ला केल्याचे प्रकार होत आहेत. बिबट्याच्या फिरस्तीमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करावे." - बाळासाहेब गरुड, शेतकरी

"सध्या बिबट्याचा मळे परिसरात मुक्त वावर आहे. गुरुवारी मध्यरात्री आळंदी कॅनॉल येथून बिबट्या जात असताना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यामुळे मळे परिसरात वस्तीवर राहणाऱ्यानी रात्री विनाकारण बाहेर पडू नये व काळजी घ्यावी. तसेच वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा." - प्रकाश उखाडे, ग्रामस्थ

हेही वाचा: Nashik : शाकांबरी नदीवरील मुख्य स्मशानभूमीचे रडगाणे थांबेना

Web Title: Free Movement Of Leopards In Mule Area Calf On Garud Vasti Killed Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikLeopard