Wedding Season : 2 मे पासून लग्नसोहळ्यांचा धूमधडाका! | From May 2 Wedding Season starting nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding season

Wedding Season : 2 मे पासून लग्नसोहळ्यांचा धूमधडाका!

Wedding Season : कसमादे परिसरात मे महिन्याच्या सुरवातीपासूनच लग्नसोहळ्यांची धूम सुरु होणार आहे. १ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत अस्त असल्याने लग्नसोहळे बंद होते. मे महिन्यात १४ तर जूनमध्ये १२ लग्नतिथी आहेत.

लग्नसोहळे सुरु होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन्स, आचारी, मंडप, फुल विक्रेते, बॅन्ड, डीजे आदींसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (From May 2 Wedding Season starting nashik news )

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अस्तमुळे बहुसंख्य लग्न खोळंबले होते. लग्नसोहळ्यांची धूम रोडावल्याने अनेक व्यावसायिकांना त्याचा फटका बसला होता. मात्र आता मे महिन्यात लग्नसोहळ्यांची रेलचेल आहे. विशेषतः रविवार असल्याने ७ व २१ मेस अनेक लग्नसोहळे होणार आहेत.

मे महिन्यातील सर्व १४ लग्नतिथींना मंगलकार्यालय, लॉन्स हाऊसफुल आहेत. अनेकांनी गावातील शाळा व सार्वजनिक सभामंडपात लग्न समारंभाचे नियोजन केले आहे.

मे महिन्यातील लग्नतिथी - २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०

जून महिन्यातील लग्नतिथी - १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८