मालेगावमधील अकरा रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road

शहरातील अकरा रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पाच कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

मालेगावमधील अकरा रस्त्यांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील अकरा रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पाच कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचे महापौर ताहेरा शेख व माजी आमदार रशीद शेख यांनी सांगितले.(fund of Rs 5 crore 50 lakh has been sanctioned for 11 roads in Malegaon)

राजकारणामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम

शहरातील काही प्रमुख रस्त्यांची बिकट स्थिती आहे. महापालिकेकडे निधीची चणचण आहे. रस्त्यांकरिता निधी आवश्‍यक असल्याचे पत्र भुजबळ यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेत रस्ताकामांसाठी निधी मंजूर करतानाच जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली.

प्राप्त निधीतून शहरातील अकरा रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यात हजारखोली कटपीस सेंटर रोड (७० लाख), आग्रा रोड (४० लाख), सर्व्हे नंबर ७८/२ (४० लाख), गोल गार्डन रोड (७० लाख), नूरबाग चौक (८० लाख), महाराष्ट्र सायजिंग रस्ता (७० लाख), आयेशानगर रस्ता (३० लाख), अजीज रिलायबल चौक रस्ता (४० लाख), हजारखोली मशीद रस्ता (३० लाख) या रस्त्यांची कामे होतील. विद्यमान आमदार शहर विकासासाठी निधी आणण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. आमदारांच्या अपयशामुळे व द्वेषमूलक राजकारणामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. जी काही विकासकामे सुरू आहेत, ती महापालिकेमार्फतच होत आहेत.

(fund of Rs 5 crore 50 lakh has been sanctioned for 11 roads in Malegaon)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात कार्यान्वित होणार ऑक्सिजन प्लांट

loading image
go to top