Onion Agitation: चांदवडला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रहारचे गणेश निंबाळकरांची प्रकृती खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Nimbalkar

Onion Agitation: चांदवडला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रहारचे गणेश निंबाळकरांची प्रकृती खालावली

चांदवड (जि. नाशिक) : कांद्याचे भाव कोसळल्याने विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या प्रहारचे गणेश निंबाळकर यांची उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावली. काहीही झाले तरी चालेल मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.

भलेही प्राण गेले तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा या भुमिकेवर ठाम असल्याचे गणेश निंबाळकर यांनी सांगितले. (Ganesh Nimbalkar health deteriorated on second day of Onion fast Agitation at Chandwad Nashik News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील वैद्यकीय अधिकारी यांनी कांदा आंदोलनातील प्राणांतिक उपोषणार्थींची वैद्यकीय तपासणी केली असता गणेश निंबाळकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला परंतु तो सल्ला धुडकावत उपोषणार्थींनी आम्ही याच ठिकाणी उपचार घेऊ असे सांगितले या प्रकरणाची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा या आंदोलनाला वेगळे वळण लागू शकते. असा इशारा उपोषणार्थींनी दिला आहे.