शुभमंगल कार्य आहे तर 'सावधान'; वऱ्हाडी म्हणून वावरणारी 'ती' टोळी गजाआड

thft.jpg
thft.jpg

नाशिक : नाशिकला गंगापूरला सोमेश्वर येथील बालाजी लॉन्समध्ये विवाहात व्यासपिठावर बसलेल्या महिलेच्या पर्समधून 16 तोळ्याचे सोन्याचे दागिणे चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदूरला तिघांना अटक केली आहे. संबंधित संशयितांनी मुंबई, पुणे, कानपूर, सुरत वापीतही चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.

अशी आहे घटना

नाशिकला 24 डिसेंबरला बालाजी लॉन्समध्ये विवाहात संशयितांनी योगिनी श्रीराम कातकाडे यांची नजर चुकवून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिणे असलेली पर्स लंपास केली. पर्समधील सुमारे 16 तोळा वजनाचे सोन्याचे दागीने व रोख 1 लाख 40 हजार असा माल चोरला होता. याप्रकरणी फिर्यादी योगिनी श्रीराम कातकाडे (रा.गंगापुर रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुन्हयाचा समांतर तपास करून मध्यप्रदेश येथील संशयिताबाबत कोणत्याही प्रकारचा धागादारे नसतांना अतिशय त्रोटक माहीतीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणीत इंदूर येथे संशयिताच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा युनिट-एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेष कुलकर्णी, पोलीस हवालदार विशाल काठे, राहुल पालखेडे, विशाल देवरे, गणेश वडजे, चालक समाधान पवार आदीच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करून इंदूर येथील एका ढाब्या जवळून स्वीफ्ट कारसह ताब्यात घेतले.

मुंबई, पुणे, कानपूर, सुरत वापीतील गुन्हे उघडकीस 

अजयसिंग कप्तानसिंग कोडांना - सिसोदिया (वय 25), बादल कृष्णा सिसोदिया (वय 19), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (वय 45), सर्वजण गुलखेडी पचोर, जि. राजगड मध्यप्रदेश असे संशयितांची नावे आहे. या तिघांकडून स्विफ्ट कार (एमपी 04 टीसी 1332)सह 7 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघा संशयितांना येत्या 5 जानेवारीपर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. संशयितांनी मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, संगमनेर, तसेच गुजरात राज्यातील तलासरी, सुरत वापी, उत्तरप्रदेशातील लखनौ, कानपूर आदी शहरात विवाहातून बॅगा चोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

अनेक राज्यात गुन्हे

संशयितांनी महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेशातील विविध शहरात मंगल कार्यालयातील लग्न समारंभात अल्पवयीन लहाना पाठवून त्यांच्यामार्फत पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापुर, संगमनेर तसेच गुजरात राज्यातील तलासरी, सुरत, वापी, लखनौ, कानपुर आदी शहरात मंगल कार्यालयातुन बॅगा चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com