नाशिकमध्ये गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

gas tanker accident
gas tanker accidentesakal

नाशिक : द्वारका चौकात घरगुती गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता.१७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली अचानक रिक्षा समोर आल्याने टँकर चालकाने ब्रेक लावला असता टँकर यातील लॉक असलेली क्लीप तुटल्याने अपघात घडला. भद्रकाली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. (gas-tanker-accident-nashik-marathi-news)

समोर रिक्षा आल्याने टँकर चालकाने ब्रेक लावला

घरगुती भारत गॅस पुरवठा करणारा टँकर क्रमांक एम एच ४३, बीजी ०६९९ मुंबई चेंबूर येथील ए जी एस कंपनीतून गॅस भरून सिन्नर एमायडिसी येथे खाली करण्यास जात होता. गुरुवार(ता.१७) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास द्वारका चौकातून सिन्नरच्या दिशेने वळण घेत असताना अचानक समोर रिक्षा आल्याने टँकर चालकाने ब्रेक लावला. अचानक ब्रेक लावल्याने टँकरला झटका लागून गॅस टँक आणि ट्रक ट्रॉली यांना जोडणारी क्लिप तुटल्याने टँकरचा तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला टँकर पलटी झाला. चालक जोहरअली खान(वय.४०,रा. कोटापूर जिल्हा प्रतापगड) थोडक्यात बचावला. काही वेळ चौकातील वाहतूकिवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली. भद्रकाली पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलास माहिती कळवली अग्निशामक दल आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बॅरेकेर्टिंग करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

मोठी दुर्घटना टळली

अपघात होऊनही गॅस टँकरला गळती झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. शिवाय अन्य कुठल्या प्रकारचा परिणाम झाला नाही. पोलीस आणि अग्निशामक दलाकडून गॅस कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. मनमाड आणि मुंबई येथील कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहे. क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्यातून हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. गॅस टँकर पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु टँकरला कुठल्याही प्रकारची गळती झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

gas tanker accident
अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा
gas tanker accident
'नकोशी'ला बेवारसपणे फेकणारी माता अखेर पोलीसांच्या ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com