
Nashik Crime News : घरावर हल्ला करणाऱ्या संशयिताकडून कट्टा, कोयता जप्त
नाशिक रोड : गोरेवाडी परिसरात एका घरावर कोयता व तलवारीच्या साहाय्याने हल्ला करून नुकसान करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला नाशिक रोड पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक करून एक गावठी कट्टा, कोयता व जिवंत काडतूस जप्त केले. (gavthi pistol axe seized from house attack suspect Nashik Crime News)
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
संदीप शंकर काकळीज यांच्या घरावर गणेश ऊर्फ छकुल्या मधुकर वाघमारे याने तलवार व कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करून घराची तोडफोड केली होती. त्यानंतर वाघमारे हा फरार झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी संबंधित संशयिताचा शोध घेण्यास सुरवात केली.
दरम्यान वाघमारे हा एकलहरे भागात असलेल्या ट्रॅक्शन परिसरात येत असल्याची माहिती मिळताच निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, विशाल सपकाळे, अनिल शिंदे, विलास गांगुर्डे, वसंत काकड, अविनाश देवरे, विजय टेमघर, मनोहर शिंदे, महेंद्र जाधव, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख, सोमनाथ जाधव, राकेश बोडके, केतन कोकाटे, योगेश रानडे आदींनी गस्त करण्यास सुरवात केली.
छकुल्या वाघमारे हा येत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस व तलवार आढळून आली. छकुल्या वाघमारे यांच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.