Ginger Rates Hike : आल्याने गाठला २०० रुपये किलोचा टप्पा!

Ginger
Gingeresakal

Ginger Rates Hike : आर्युवेदिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या आल्याचे भाव अचानक वाढल्याने सर्व सामान्यांना आता न पडणारे झाले आहे. गेल्या महिन्यात ७० ते ८० रुपये किलोदराने मिळणाऱ्या आल्याला आता नागरिकांना दोनशे रुपये मोजण्याची वेळ आली आहे. (Ginger Rates Hike Rs 200 per kg nashik news)

Ginger
Talabhishek : तालाभिषेक बैठकीत स्वप्नील भिसेंचे तबलावादन! कुसुमाग्रज स्मारकात संगीत मैफील

ऐन उन्हाळ्यात आल्याचे भाव वाढल्याने नागरिकांना आले घेताना हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. दैनंदिन आहाराबरोबरच चहासह आल्याचा अधिक वापर होतो. सध्या लग्नसराई जोरात असल्याने आल्याची मागणी वाढली आहे.

आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाणारा नागरिक आवर्जून आले खरेदी करतो. आहाराबरोचर आरोग्यासाठी आणि औषध म्हणून देखील आल्याचा वापर हमखास होत असतो. मात्र आता आल्याने किलोला दोनशे रुपयाचा टप्पा गाठल्याने हेच आले आता सर्वसामान्याच्या आवाक्यात बाहेर गेले आहे.

Ginger
Humanity : देवदूत बनून आलेल्या तरुणाने वाचवले पोलिस कर्मचाऱ्याचा जीव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com