Nashik Crime News : वाढोली फाट्याजवळ अपघातात चिमुरडी ठार | Girl killed in an accident near Vagholi Phata Nashik Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Nashik Crime News : वाढोली फाट्याजवळ अपघातात चिमुरडी ठार

Nashik Crime News : वाढोली फाटयाजवळ दुचाकीला दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सात वर्षीय चिमुरडी ठार झाली तर, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गायत्री गजानन कामडी (७, रा. बेलतगव्हाण, ता. जि. नाशिक) असे चिमुरडीचे नाव आहे. (Girl killed in an accident near Vagholi Phata Nashik Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सागर सोमनाथ झोले (२४, रा. पेगलवाडी, त्र्यंबक) हे गेल्या बुधवारी (ता. १७) सकाळी नऊला नाशिककडे येत होते. त्यावेळी वाढोली फाट्याजवळ असता भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. जखमी दोघांना विशाल आचारी याने उपचारार्थ तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचार सुरु असताना दुपारी दीडला गायत्रीचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार सागर उपचार घेत आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikAccident Death News